माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे कवी श्रेष्ठ कालिदास यांची जयंती संस्कृत दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कवी श्रेष्ठ कालिदासांच्या प्रतिमेपुजनाने झाली. यानंतर विद्यालयातील ज्ञानदा कुलाच्या विद्यार्थ्यांनी श्लोक पठण, नृत्य, गायन, कवी कालिदास यांची माहिती इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण केले. संस्कृत दिनाचे औचित्य साधून ज्ञानदा कुलातील इयत्ता 5वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांची संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना याप्रसंगी बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. निखिल बडवे सर ( ह. दे. प्र. तथा कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर ) यांनी आधुनिक काळात संस्कृत भाषेचे महत्व, संस्कृत भाषेमुळे वाढणारा बुद्ध्यांक तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी संस्कृत भाषा कशी उपयोगी पडते याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे ˈअड्व्हकेइट् सुप्रिया शिरदाळे यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक संदर्भाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थाअध्यक्षा माननीय डॉ. संजीवनीताई केळकर, कोषाध्यक्ष डॉ. शालिनीताई कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर, पर्यवेक्षक मिसाळ सर, संस्कृत विषय शिक्षिका भिंगार्डे मॅडम, ज्ञानदा कुलाच्या कुलप्रमुख सौ सपताळ मॅडम, व ज्ञानदा कुलातील सहाय्यक शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम ज्ञानदा कुलातील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी सौ भिंगार्डे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कु. कृष्णाली तारळेकर व अहाना मणेरी या विद्यार्थिनींनी केले.