खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पत्रानंतर वासुद रेल्वे स्थानकांवर मुलभूत सुविधा प्रदान
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या रेल्वे विभागीय प्रबंधकांना लिहलेल्या पत्रानंतर सांगोला तालुक्यातील वासुद रेल्वे स्टेशनवर लाईटची सुविधा उपलब्ध झाली तर स्टेशन परिसर व मार्गावरील वाढलेले कांटेदार वृक्ष काढून टाकण्यात आले.
सांगोला तालुक्यातील वासुद रेल्वे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या रस्त्याच्या कडेला काटेरी वृक्ष वाढले आहेत. त्याचबरोबर या रेल्वे स्टेशनवर लाईटची सोय नाही. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधा कराव्यात व रेल्वे स्टेशन परिसर व रस्त्यावरील काटेरी वृक्ष काढून टाकावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात होती
सदर मागणी लक्षात घेऊन खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर विभागीय प्रबंधक यांना पत्र लिहून मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात म्हणून सुचना केल्यानंतर वासुद रेल्वे स्टेशनवर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही सुरू झाली.
पंढरपुरचे रेल्वेचे वाणिज्य अधिकारी अमोल जोशी यांनी वासुद रेल्वे स्टेशनवर प्रत्यक्ष येऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली यावेळेस जोशी यांनी सांगितले स्टेशन परिसरातील व प्रवाशांच्या येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरील वाढलेले कांटेदार वृक्ष काढून टाकण्यात आले तसेच आणखी पंधरा दिवसांनी इतर मूलभूत सुविधांचे कामकाज करण्यात येईल याचबरोबर स्टेशन व परीसरात ६ दिवे बसवण्यात आले असल्याची माहिती सांगितली.
——————————————————-
वासुद रेल्वे स्थानकात असणाऱ्या गैरसोई बद्दल आम्ही वारंवार रेल्वे विभागाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नव्हती आम्ही वासुदच्या नागरिकांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी याबाबत सांगितले यावर खासदार धैर्यशील भैय्यांनी विभागीय प्रबंधकांना सांगून आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला याबद्दल आम्ही वासुदच्या ग्रामस्थांच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे आभार मानतो
वैभव केदार,नागरिक वासुद