डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे विवेक वहिनी अंतर्गत विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या विषयावर चर्चासत्र संपन्न
दिनांक ३ सप्टेंबर 2024 रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे विवेक वहिनी अंतर्गत विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी केदार पूनम हिने पूर्वीच्या काळी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताच्या पिढीचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यामधील फरक सांगितला. पूर्वी शिक्षण म्हणजे ज्ञान, गुरू परंपरा जपल्या जायच्या, पण आता शिक्षण म्हणजे व्यवसाय आणि नोकरी डोळ्यासमोर ठेवले जाते असे मत व्यक्त केले. तसेच लवटे अभिजीत या विद्यार्थ्यांनी आयुष्यात तीन गुरू म्हणजे पहिले आपले आई-वडील दुसरे गुरुजन आणि तिसरे म्हणजे आपले शिक्षण आहे. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थिनी वैष्णवी भंडारी हिने शिक्षण म्हणजे नुसते पुस्तकी ज्ञान नसून व्यवहाराततील जगणे म्हणजे शिक्षण असे सांगितले.
या समितीच्या सदस्य प्रा. मोनाली शिंदे यांनी शिक्षणाचा उद्देश कौशल्य विकासासाठी होतो आणि तो वाढवला पाहिजे असे मत व्यक्त केले. या समितीच्या चेअरमन डॉ. शितल शिंदे यांनी आपल्या आवडीनुसार शिक्षण घेतले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याला मदत होते. तसेच शिक्षण म्हणजे नोकरी, पैसा नसून कोणत्याही व्यवसायाचे पूर्वतयारी आणि संधी आहे, असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.