नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक कार्यशाळा संपन्न
नाझरा( वार्ताहार):- पालकांनी मुलांचा कल ओळखावा आणि त्यांना ज्या गोष्टी चीआवड आहे त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. आपली मुले कोणाच्या संगतीत असतात याकडे लक्ष द्यावे. पालकत्व हे सुजान असले पाहिजे. असे प्रतिपादन मा.निर्मला कोळवणकर यांनी केले. नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल ,नाझरा येथे नर्सरी ते चौथी च्या पालकांसाठी आयोजित कार्यशाळा मध्ये त्या बोलत होत्या.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. मंगल पाटील तसेच नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक बिभीषण माने सर यांच्या हस्ते मा. निर्मला कोळवणकर व मा. केदार कोळवणकर, पूजा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा चे पर्यवेक्षक मधुकर धायगुडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. शामल लोखंडे मॅडम यांनी करून दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पालकत्व ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे.
पालकांचे मुलांसोबत मित्रत्वाचे वर्तन असावे. आपल्या मुलांवर दडपण न आणता त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावं व त्यांना पुस्तक वाचण्याची सवय लावावी.
मुलांच्या भावनांचा आदर करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच धनवर्धन वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत नर्सरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांचा क्लब केला आहे.त्याअंतर्गत ड्राईंग काम्पिटिशन घेऊन त्याचे बक्षीस वितरण कोळवणकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शामल लोखंडे यांनी केले आणि आभार कु. जाधव मॅडम यांनी केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो पाठवत आहे