दिपकआबा साळुंखे पाटील यांचे चिरंजीव आणि सांगोला तालुक्याचे आश्वासक युवा नेतृत्व यशराजे साळुंखे पाटील यांनी भारतातील क्रमांक एकचे विद्यापीठ असलेल्या सिम्बॉयसिस या विद्यापीठातून वकिलीची (एल.एल.बी.) पदवी प्राप्त केली आहे.
सिम्बॉयसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेजचा दीक्षांत समारोह अर्थात पदवी प्रदान सोहळा पुणे येथे पार पडला. त्यावेळी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मूर्मूजी, राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, सिम्बॉयसिसचे कुलगुरू डॉ. एस.बी मुजुमदार, प्रधान सचिव डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
एल एल बी चे शिक्षण पूर्ण करत असताना यशराजे साळुंखे पाटील यांनी सदैव स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारापासून प्रेरणा घेतली. स्व. ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या संस्कारात वाढल्याने अत्यंत प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात जन्म घेऊनही सर्वसामान्य नागरिकांशी मिळून मिसळून वागणे तसेच मनमिळावू स्वभाव यामुळे त्यांच्या या यशाला आणखी झळाळी प्राप्त होते. स्वर्गीय ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांचे संस्कार वडील दिपकआबा साळुंखे पाटील आई सौ रूपमती साळुंखे पाटील यांची शिकवण तसेच काका डॉ. प्रदीपदादा साळुंखे काकी सौ मधुमती साळुंखे, आत्या जयमालाताई गायकवाड व चारुशीलाताई काटकर आणि जेष्ठबंधू डॉ. पियुषदादा साळुंखे, ज्येष्ठ भगिनी सौ मुक्तादीदी गायकवाड, कृष्णाई साळुंखे, यांच्या योग्य मार्गदर्शनातूनच यशराजे साळुंखे पाटील यांनी या यशाला गवसणी घातली. पुण्यात सिम्बॉयसिस सारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना त्यांनी कधीही आपली मातीशी नाळ तुटून दिली नाही. सांगोला तालुक्यातील जनतेच्या सुख दुःखात नेहमीच युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांनी सहभाग घेतला. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या अनुपस्थितीत सांगोला तालुक्यातील त्यांची धुरा सक्षमपणे सांभाळत शिक्षणकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. अत्यंत कमी वयात सांगोला तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवून यशराजे साळुंखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केले. शिक्षण आणि समाजकारण अशा दुहेरी भूमिका नेटकेपणाने निभावत यशराजे साळुंखे पाटील यांनी वकिलीची पदवी प्राप्त केल्याने सांगोला तालुक्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
—————————————-
विश्वविख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर पदवी (L.L.M.) पूर्ण करण्याचा निर्धार..!
भारतातील नामांकित विद्यालयातून एल.एल.बी. अर्थात वकिलीची पदवी पूर्ण केल्यानंतर ॲड. यशराजे साळुंखे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एल.एल.बी. ची पदवी पूर्ण केल्यानंतर आता पुढील एल.एल.एम. ची पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विश्वविख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाण्याचा निर्धार ॲड. यशराजे साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी यांनी याच संस्थेतून शिक्षणाचे धडे गिरवले आहेत.