बलवडी परिसरात रात्री ड्रोनच्या घिरट्या
बलवडी ता. सांगोला व परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याचे आढळून आल्याने नागरिकाच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. अगोदरच चोरट्यांचा सुळसुळाट आणि आपोआचे पीक जोमात असताना रात्रीच्या वेळी गिरट्या घालणारे ड्रोन नागरिकांची चिंता वाढवणारे आहे
याबाबत प्रशासनाने खुलासा होत नसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे असे मत मा. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपटराव शिंदे यांनी मांडले.
बलवडी व परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरट्याचा कालवा यातच रात्री दोनच्या गिरट्या उशिरापर्यंत सुरू त्यामुळे ड्रोनचे गुड उकलले जात नाही व ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती बरोबरच चोरट्यांबाबत जशी तिचे वातावरण तयार झाले आहे. ड्रोन व चोरटे याबाबत काही जणांचे अफवाचे पीक असे सांगितले जात आहे परंतु रात्री बऱ्याच नागरिकांनी खातरजमा करून घेतली त्यामुळे गावात वस्तीवर राहणारे लोक जीव मुठीत धरून वावरत आहेत. सदरचा ड्रोन कोणत्या उद्देशाने फिरवले जाते व यामागील हेतू काय याचा उद्देश शोधून काढण्याचे काम पोलीस प्रशासन व महसूल विभागाने हाती घेण्याची गरज आहे व त्यासाठी परवानगी घेतली का व कोणत्या उद्देशाने फिरत आहेत याचा खुलासा प्रशासनाने लवकरात लवकर करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
नाझरे परिसरात ही मागील काही दिवसात ड्रोन फिरत असल्याच्या तोंडी तक्रारी लोकांच्याकडून येत आहेत व रात्रीच्या वेळी घरट्या घालणारे ड्रोन कोणाचे, व कशासाठी उडवले जात आहे याचा उलगडा झाला नाही त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.