शिक्षकदिनी शिक्षकाचा वाढदिवस असणे हे भाग्याचे लक्षण- झिरपे सर
.
सांगोला – 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.या दिवशी एखाद्या शिक्षकाचा वाढदिवस असणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे.त्यामूळे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष महिमकर हे अति भाग्यशाली असुन आजचा त्यांचा वाढदिवस हा दुग्ध- शर्करा योग आहे,असे कौतुकोद्गार झिरपे सर यानी काढले.
चैतन्य हास्य क्लबने आयोजित केलेल्या सुभाष महिमकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.सांगोला शहरातील राणौजी बुवा मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी प्रा.उत्तमराव घाटुळे यांच्या हस्ते महिमकर यांचा सत्कार करण्यात आला.महिमकर हे आमचे गल्ली मित्र असुन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यानी परिश्रम करुन जीवनात यश व स्थैर्य प्राप्त केले आहे,असे सांगुन प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी शुभेच्छा दिल्या.डॉ.कृष्णा इंगोले,म.शं.घोंगडे,अरविंद डोंबे यानी मनोगत व्यक्त केले.
महिमकर यानी सत्कार बद्ल कृतज्ञता व्यक्त केली.अध्यक्ष जगताप सर यानी प्रास्ताविक व सचिव भागवत पैलवान यानी आभार प्रदर्शन केले.या वेळी हेमंत तेली,जयंत तेली,मिलिंद पतंगे,सुधीर दौंडे,प्रताप इंगोले,उत्तम पाटोळे,अशोक जाधव,चंद्रकांत जाधव,प्रकाश होनराव,विश्वेश्वर कोठावळे,अशोक केदार ,भाऊसाहेब पवार आदि उपस्थित होते..