नाझरे पोलीस स्टेशन असून अडचण नसून खोळंबा
संत कवी श्रीधर स्वामी यांचे जन्मस्थळ असलेल्या नाझरे या संताच्या पावन भूमीत अवैध धंदे जोमात तर पोलीस मात्र कोमात अशी अवस्था असून, नाझरे पोलीस चौकी कायम बंद अवस्थेत असून, अधिकारी व कर्मचारी जसे जमेल तसे म्हणजे वसुलीला आधी व कामाला कधीतरी त्यामुळे सध्या पोलीस स्टेशन नावाला व कोणीच नाही कामाला व त्यामुळे पोलीस स्टेशन असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे व अधिकारी व कर्मचारी येथे येत नसल्याने नागरिकांना सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार आगर इतर कामासाठी जावे लागत आहे व त्यामुळे राम भरोसे कारभार असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यापूर्वीचे अधिकारी व कर्मचारी असे करीत नव्हते असे नागरिकात बोलले जात आहे.
नाझरे पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे बारा गावे ते वाड्या वस्त्या यामध्ये नाझरे, वझरे, बलवडी, अजनाळे, चिनके, लिगाडेवाडी, वाटंबरे, अनकढाळ, राजुरी, उदनवाडी, कारंडेवाडी, पाचेगाव, चोपडी, सरगर वाडी, झापाचीवाडी इत्यादी गावे व वाड्या वस्त्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असून, नागरिक कामासंदर्भात येतात परंतु येथे साहेब, कर्मचारी नाहीत, सांगोल्याला जावा असे सांगितले जात आहे म्हणजे आऊट पोस्ट नावालाच आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत त्यामुळे रामभरोसे कारभार आहे व या हद्दीत अवैध धंदे तर जोमातच आहेत त्यामुळे जमेल तसे वसुलीसाठी येता का असा प्रश्न नागरिक करीत आहेत
व त्यामुळे आसपासच्या 12 ते 15 गावे व वाड्या वस्त्या येथील नागरिक त्यांच्या अडीअडचणी व तक्रार निवारण्यासाठी येतात परंतु निवारण होत नाही कारण अधिकारी व कर्मचारी यांचे ढिसाळ नियोजन त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे येतात व त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे.
नाझरे परिसरात चोरीचा कालवा त्यात ड्रोनची भर.. नागरिकात भीतीचे वातावरण… पोलीस गस्त गरजेची
नाझरे व परिसरात सध्या चोराचा व चोरीचा कालवा असल्याने रात्री नऊ ते दहा वाजले की घरे भीतीपोटी नागरिक बंद करीत आहेत व त्यातच रात्रीच्या वेळी घेरट्या घालणारे ड्रोन नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. चोरट्याचा कालवा व त्यात ड्रोन च्या घिरट्या त्यामुळे गुड उकलले जात नाही व याबाबत काही जणांचे अपवाचे पीक आहे असे सांगितले जात आहे परंतु बऱ्याच नागरिकांनी खातरजमा करून घेतली आहे. त्यामुळे गावात वस्तीवर राहणारे लोक जीव मुठीत धरून वावरत आहेत. त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे यासाठी पोलीस गस्त गरजेचे आहे. सदरचा ड्रोन कोणत्या उद्देशाने फिरवले जात आहेत व यामागील हेतू काय याचा शोध महसूल व पोलीस प्रशासनाने लावून खुलासा करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
*नाझरे पोलीस स्टेशनला कर्मचारी हजर नसलेबाबत*
नाझरे व परिसरात चोरीचा कालवा व ड्रोनची भर त्यामुळे नागरिक भयभीत झाली आहेत व येथील आठवडा बाजार शुक्रवारी भरतो व वाहतुकीची कोंडी बाजार चौकात होते व त्यामुळे नाझरे व परिसरात सुमारे 12 ते 15 गावे वाड्या वस्त्यासह नागरिक येतात परंतु त्यांच्या अडीअडचणी, तक्रार, संवाद व सूचना देण्यासाठी येथील पोलीस स्टेशनला हेलपाटे नागरिकांना घालावी लागत आहेत परंतु कायम बंद पोलीस स्टेशन त्यात कर्मचारी नाहीत व अधिकारी नाही व यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे. किमान दोन पोलीस कर्मचारी तरी दररोज हजर राहावेत अशी नागरिकांची मागणी असल्याने आम्ही याबाबत सांगोला पोलीस निरीक्षक सो, तहसीलदार सो, पोलीस उपविभागीय अधिकारी सो, मंगळवेढा व सोलापूर येथे गैरसोयी बाबत पत्रव्यवहार केला आहे, लवकरच न्याय मिळेल.*
*सौ. मंदाकिनी सरगर*
*सरपंच ग्रामपंचायत नाझरे* *ता.सांगोला*