.सावे माध्यमिक विद्यालयात सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने निर्भया पथकाचा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी सांगोला पोलीस स्टेशनचे निर्भया पथकातील प्रमुख पीएसआय स्नेहल चव्हाण मॅडम, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख मॅडम, पोलीस हेडकॉन्स्टेबल कुंभार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सौरभ आडके, व सावे गावचे पोलीस पाटील विजय माने उपस्थित होते
सर्वप्रथम पीएसआय स्नेहल चव्हाण मॅडम यांचे स्वागत आणि सत्कार इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया देवकते हिने शाल व श्रीफळ देऊन केला. त्यानंतर शेख मॅडम यांचा सत्कार इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी कुमारी ज्योती कांबळे हिने शाल व श्रीफळ देऊन केला तसेच हेड कॉन्स्टेबल कुंभार व सौरभ आडके यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी केले.त्यानंतर निर्भया पथकातील प्रमुख पीएसआय स्नेहल चव्हाण मॅडम यांनी महिला, मुली व मुले यांच्यावर होणारे अत्याचार ,त्यांच्या अडचणी याविषयी समुपदेशन केले तसेच विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा याविषयी माहिती सांगितली.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपलं करिअर चांगलं घडवावं असेही सांगितले .मोबाईलचा गैरवापर टाळा ,आपल्या काही अडचणी असतील तर शाळेच्या तक्रार पेटीमध्ये टाकून संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक किंवा पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन आपल्या अडचणीचे निवारण करून घ्यावे असे सांगितले.
तसेच शेख मॅडम यांनी निर्भया पथकाविषयी माहिती सांगून आपल्याला कोणतीही अडचण आल्यास 112 नंबर वरती कॉल करून तक्रार नोंदवण्याची माहिती सांगितली . तसेच ट्रॅफिक विषयी माहिती त्यांनी सांगितली .सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी केले.