सावे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून विद्यालयांमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर, मेटकरी सर व अनुसे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री मेटकरी सर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगितली.
त्यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान गुलाब फुल व श्रीफळ देऊन करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिनांक 5 सप्टेंबर या दिवशी इयत्ता आठवी, नववी व दहावी या वर्गाला अध्यापन केले.
शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कुमारी सुप्रिया देवकते हिने काम पाहिले. संपूर्ण दिवसभर विद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून सानिका लवटे, आकांशा देवकते ,वनिता बंडगर, वैष्णवी नलवडे, अनुष्का रड्डी, सानिका गावडे, स्वप्नाली इमडे , सानिका कोळी ,स्वप्नाली ननवरे, श्रुती साळुंखे, अंजली गावडे, काजल गडदे, युवराज कोडगर, हिमांशू कांबळे ,वैभव माने, यश देवकते ,सूर्यकांत पांढरे व राजू वाघमोडे यांनी काम पाहिले. तसेच शिपाई म्हणून अतुल वाघमोडे ,पवन शेजाळ, समर्थ इमडे श्रीवर्धन मेटकरी यांनी भूमिका बजावली .
त्यानंतर शेवटी पाच सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांचाही वाढदिवस विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून करण्यात आला व विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .
वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयातील गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले .तसेच 5 सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी अध्यापनाचे काम केलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने गुलाब फुल व श्रीफळ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मेटकरी सर यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.