आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
“L
आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील विद्यार्थी नवाज बागवान याने केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मयुरी नवले मॅडम यांनी केले. त्यांनी शिक्षक दिनाविषयी महत्त्व मुलांना सांगताना एक पेन ,एक पुस्तक, एक विद्यार्थी, एक शिक्षक सर्व काही बदलू शकतो असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये शिवम शिर्के, शांभवी माने, अनन्या जाधव, आरती संकपाळ, अमृता राऊत, निलम वाघमारे, अथर्व खंडागळे, भक्ती लिंगे, शिवन्या कदम ,क्रांती यमगर, सोनाली विभुते, प्रतिक फुले, नवाज बागवान, रुद्र वाघमोडे, गौरी राऊत ,प्रांजल तोरगळे, अर्पिता दौंडे, अर्पिता खंडागळे, दुर्गाप्रेरणा खटावकर, अन्वी सावंत, वेदिका जानकर, आदिती यमगर, ईशिता गोडसे, शुभ्रा माने, शौर्य कांबळे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
त्यानंतर शिक्षक दिनानिमित्त इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, गणित, चित्रकला, कार्यानुभव हे विषय इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांना चांगल्या प्रकारे शिकवले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सुलेखा केदार मॅडम यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे सर, श्री विशाल होवाळ सर ,सौ. जयश्री वाघमोडे मॅडम ,सौ. शितल माळी मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.