जि.प.प्रा.शाळा-चव्हाणवाडी व केसकरवस्ती शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांमधून रोजिया शेख, तनिष्का केसकर, परी डुबुले, सैफ शेख, सिद्धार्थ गोसावी यांनी सांगितली. शिक्षकांमधून श्रीमती वंदना पाटणे मॅडम यांनी शिक्षक दिन या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले तसेच डॉ-राधाकृष्णन यांच्या जीवनातील कर्तव्यनिष्ठा, आज्ञाधारकता या प्रसंगाचे सादरीकरण केले. तसेच गुरूंचे समाजातील स्थान, गुरूंची व्याख्या–याविषयी विवेचन श्री विठ्ठल तांबवे सर यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती वंदना पाटणे मॅडम यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल तांबवे सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री धुळा सातपुते सर यांनी केले. मुख्याध्यापक म्हणून श्री सिद्धार्थ गोसावी या विद्यार्थ्याने दिवसभराचे कामकाज पाहिले. विवेक डोंगरे, सैफ शेख, अन्विता निकम, वेदिका जाधव, परी डुबुले, तनिष्का केसकर, माऊली सावंत, दक्ष घाडगे, आर्यन डोंगरे, प्रणव नागणे, कृष्णा केसकर , शिवतेज वाघमोडे, राजवर्धन लवटे या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले. अशाप्रकारे जि.प.प्रा. शाळा चव्हाणवाडी व केसकरवस्ती या शाळेत डॉ- सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन उत्साहात पार पडला. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन ऋण व्यक्त केले.