सांगोला महाविद्यालयात गुरुवार दि.05 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आय.क्यु.ए.सी. कोऑर्डीनेटर डॉ. राम पवार, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अर्जुन मासाळ व डॉ. अमोल पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले होते. या कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी शिक्षकांना संबोधित करताना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट व त्यांच्या जीवनातील विविध उदाहरणे सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भूगोल विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षकांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बबन गायकवाड, डॉ.अमोल पवार यांनी परिश्रम घेतले व श्री. बाबासो इंगोले, श्री. अमर केदार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.