सांगोला नगरपरिषद हद्दीतील नागरी वस्ती योजनेअंतर्गत दलित वस्तीतील कामांना १कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील.
सांगोला शहरातील नागरी वस्ती योजनेअंतर्गत दलित वस्ती कामांना जिल्हा नियोजन समिती कडून १कोटी ६१लाख रुपये निधी मागणी केल्याप्रमाणे मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
१)राजू माने घर आण्णा बनसोडे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी २२लाख ६५ हजार रुपये मंजूर झाले आहेत२) मोकिंद भोरकडे घर ते राजू बनसोडे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे २२लाख ८३हजार ३),शितल खरबडे घर ते कुंदन बनसोडे घर ते शिवाजी कांबळे फार्म ते विकास बनसोडे पोल्ट्री फार्म पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे२९ लाख ७४ हजार४) किरण बनसोडे घर ते राजू बनसोडे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख ७० हजार ५)बापूजी नगर रोड ते अरुण पाटील घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १४ लाख ७३हजार ६) बापूजी नगर रोड ते चारुदत्त खडतरे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ८ लाख ९७ हजार ७)बापूजी नगर रोड ते महेश खडतरे विहिरीपर्यंत रस्ता काँक्रीटकरण करणे १३ लाख ५३ हजार ८)भीमनगर येथील कट्टा सुशोभीकरण करणे
९लाख ८४हजार९) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन सुशोभीकरण करणे २२ लाख ५५हजार असे नऊ कामांसाठी १ कोटी ६१ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे सांगोला शहरातील ही कामे पूर्ण झाल्यावर सांगोला शहराचे विकासामध्ये अधिक भर पडणार आहे सदरची कामे नगरपरिषदेच्या मार्फत निविदा प्रक्रिया राबवून लवकर सुरु करावेत तसेच वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.