रमजान ईद अगोदर इदगाह मैदानाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे – आमदार शहाजीबापू पाटील; इदगाह मैदानाच्या कामाची पाहणीसाठी अधिकाऱ्यांसोबत दिली भेट
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-03-28-at-6.39.09-PM-780x383.jpeg)
सांगोला ( वार्ताहर) : सांगोला शहरातील मुस्लिम बांधवांचा सुमारे 50 वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असणारा इदगाह मैदानाचा प्रश्न आता मार्गी लागला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क वर्ग नगरपालिकेच्या शहरांमध्ये सगळ्यात सुंदर व देखणे ईदगाह मैदान सांगोल्यात साकारत आहे याचा मला सार्थ अभिमान असून अल्लाहने या पवित्र कामासाठी हातभार लावण्याची संधी मला दिली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
काल मंगळवार दिनांक 28 मार्च रोजी इदगाह मैदानाच्या कामाची पाहणी करण्याकरिता आमदार शहाजीबापू पाटील यांनी शासकीय अधिकारी व मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांसोबत इदगाहच्या कामाला भेट दिली यावेळी ईदगाह मैदानाचे सुसज्ज व भव्य काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व येणाऱ्या रमजान ईदची नमाज या नवीन ईदगाह मैदानावरच झाली पाहिजे यासाठीच अपूर्ण असलेली कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत व कामाची गुणवत्ता उत्तम प्रकारे राखण्यात यावी असे आदेश नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व ठेकेदार धनाजी राऊत यांना दिले.
सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून मुस्लिम समाजाच्या भव्य इदगाह मैदानाचे काम अत्यंत वेगात सुरू आहे इदगाह मैदानाच्या कामातील कुंपण भिंत, हॉल, निवासस्थान चे कामे पूर्ण झाले असून चबुतरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे येत्या १५ ते २० दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात यावीत असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले यावेळी तहसीलदार तथा प्रशासक अभिजीत पाटील मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी गटविकास अधिकारी आनंद लोकरे इंजिनियर अभिराज डिंगणे आकाश करे यांच्या सह मुस्लिम समाजातील माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ हाजी शब्बीर भाई खतीब दिलावर तांबोळी माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला माजी नगराध्यक्ष रफिक तांबोळी माजी नगरसेवक रफिक निजाम तांबोळी युसूफ मुलाणी उस्मान मुलाणी पोपट खाटीक कमरुद्दीन खतीब यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते