*फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न*
*पर्सनल / प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स असणे खूप महत्त्वाचे*

सांगोला :येथील फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, सांगोला व बार्कलेज लाइफ स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागांतर्गत सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२४ आयोजित केला होता.अशी माहिती प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाबरोबर आजच्या काळात पर्सनल व प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स असणे खूप महत्त्वाचे आहे. सॉफ्ट स्किल्समध्ये संवाद कौशल्य, ऐकण्याचे, टीममध्ये वावरण्याचे आणि समस्येचे निवारण करण्याचे कौशल्य, नेतृत्व गुण व सर्जनशीलता यांचा या गोष्टी विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. त्या बरोबरच महाविद्यालयीन व व्यावसायिक जीवनाव्यतिरिक्त, नोकरी मिळवण्यासाठी, नोकरीमध्ये टिकून राहण्यासाठी तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि अधिक चांगले जीवन जगण्यासाठी सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत. यासाठी सॉफ्ट स्किल्स आत्मसात करण्यासाठी आवश्यकता असते.
त्या बरोबरच सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ अवर्नेस,बॉडी लँग्वेजेस, रिझुमटेक्निक या विषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले .
हा ट्रेनिंग प्रोग्राम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, डीन अँकँडमीक डॉ. वागीशा माथाडा, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.धनंजय शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.