कोकरे बंधू यांचेकडून बलवडी शाळेस पाच हजार रुपये किंमतीची गोष्टीची पुस्तके शाळेस भेट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे महावाचन चळवळ अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात.बलवडी गावातील कोकरे बंधू श्री मारुती बाबुराव कोकरे व बळरीम बाबुराव कोकरे यांनी त्यांचे वडील कै. बाबुराव सुभाना कोकरे यांच्या ८ व्या. स्मृति दिनानिमीत्त मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी दर्जेदार साहित्य वाचनास मिळावे यासाठी पाच हजार रुपये किंमतीची गोष्टीची पुस्तके शाळेस भेट दिली.
यावेळी मा.श्री बळीराम कोकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला व पुस्तके वाचन करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सागर गुरव सर यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . बाळासो खुळपे. शिक्षणप्रेमी श्री. चांगदेव शिंदे, ग्रा.पं. सदस्य श्री. विकास पवार. पालक सौ. आषाराणी सुभाष कोकरे. श्रीमती मंगल सासणे मॅडम. शिक्षक श्री. गोरखनाथ बनसोडे सर, श्री. विजयकुमार शिंदे सर, श्री. सागर गुरव सर शिक्षिका श्रीमती योगिता शांत मॅडम, श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोहर पवार सर यांनी सर्वांचे आभार मानले.