जवळा येथील करसिद्ध गणेश तरुण मंडळाच्या श्री.ची आरती सौ.रूपमतीदेवी साळुंखे-पाटील यांच्या हस्ते संपन्न.
.
जवळा(प्रशांत चव्हाण) सांगोला तालुक्यातील जवळा सोनंद रोड येथील करसिद्ध गणेश तरुण मंडळाच्या वतीने श्री गणेशाची आरती मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.रूपमतीदेवी साळुंखे-पाटील यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी संपन्न झाली.तसेच महिला वर्गाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच उपस्थित ग्रामस्थ युवक वर्ग महिला यांना मंडळाच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. तसेच सौ.रूपमतीदेवी दीपकराव साळुंखे पाटील यांचा सत्कार मंडळाच्या वतीने सौ.सारिका गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदरप्रसंगी.उद्योगपती श्री.विजय पाटील,युवक नेते श्री.विकास गावडे अध्यक्ष श्री.साहेबराव सावंत,उपाध्यक्ष श्री.श्रीकांत गावडे खजिनदार श्री.बालाजी चोरमुले,सचिव श्री.प्रकाश गावडे,श्री. नारायण गावडे,श्री.अनिल गावडे,श्री.जनाप्पा गावडे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य,युवक वर्ग, ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.