sangola
माणदेश महाविद्यालयांमध्ये बी.ए बीएस्सी,बीएस्सी(ईसीएस)प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ संपन्न
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळतो. त्यांच्यामध्ये देशाप्रती आदर निर्माण होतो समाजसेवेची भावना वाढीस लागते असे मत प्रा. तानाजी लवटे यांनी व्यक्त केले ते माणदेश महाविद्यालय, जुनोनी ता. सांगोला जि. सोलापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व बी.ए बीएस्सी,बीएस्सी(ईसीएस)प्रथम वर्षाचा स्वागत समारंभाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष माननीय माजी प्राचार्य सुबराव बंडगर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.एन.लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. सतीश फुले उपस्थित होते. प्रारंभी माजी प्राचार्य सुबराव बंडगर व प्राचार्य. डॉ.टी.एन.लोखंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर बी.ए. बीएस्सी,बीएस्सी(ईसीएस) भाग एक विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये माजी प्राचार्य सुबराव बंडगर म्हणाले की, ज्ञान, संस्कार, विकास, हा शिक्षणाचा ध्यास आहे. विद्यार्थी दशा नंतर मिळत नाही. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी. एन. लोखंडे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सहानुभूती रुजावी, समभाव जागृत व्हावा, त्याचबरोबर महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक, सर्व विद्यार्थी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित, होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सतीश फुले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. लकी पवार यांनी केला सूत्रसंचालन प्रा. उषा कोळवले यांनी केले. तर आभार प्रा. शरद पवार यांनी व्यक्त केले.