सांगोला तालुका

जवळे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवास उत्साहात प्रारंभ.

श्री.क्षेत्र जवळे येथील श्री.नारायण देवाच्या मंदिरात रवि दिनांक 15 ऑक्टोबर पासून भगवतभक्त   ह भ प कै.शारदादेवी(काकी)बापूसाहेब साळुंखे-पाटील यांच्या दिव्य संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील व सौ.रूपमतीदेवी दीपकराव साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
सकाळी 9.30 वाजता दीप प्रज्वलन करून जवळे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.सुषमाताई संभाजीराव घुले सरकार यांच्या शुभहस्ते कलश पूजन करण्यात आले. तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन सौ.रजनी सुभाष आमले यांच्या हस्ते तर विनापूजन ह भ प डॉ.बिरा महाराज बंडगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच भगवतभक्त ह भ प कै.शारदादेवी(काकी) साळुंखे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठ चालक ह भ प श्री.रामदास सुरवसे महाराज यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचनास सुरुवात केली.यावेळी गावातील महिलांनी ज्ञानेश्वरी पारायणास हजेरी लावली.
सदर प्रसंगी श्री.साहेबरावदादा पाटील,श्री.पंडितकाका साळुंखे श्री.बाबासो इमडे, श्री.विलासराव घुले सर,श्री.प्रवीण साळुंखे श्री.सदाशिव साळुंखे यांच्यासह महिला व पुरुष भाविक भक्त उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.चंद्रकांत सुतार,श्री.दीपक चव्हाण,श्री.रमेशआप्पा साळुंखे,श्री.जयवंतराव नागणे गुरुजी तसेच चोपदार बाबासो सावंत,विण्याचे सेवेकरी,मृदंगमणी, गायक यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!