विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; ‘या’ दोन तारखा आहेत महत्त्वाच्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.