सांगोला तालुका

जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू श्रीरामाच्या मूर्ती, प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून सांगोल्यात राम नामाचा जल्लोष

सांगोला -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी 12:30 वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ऐतिहासिक सोहळा संपन्न होताच सांगोला शहर व तालुक्यातील उत्साह शिगेला पोहचलेल्या तमाम रामभक्तांनी बोला सिया पती प्रभू रामचंद्र की जय.. जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू श्रीरामाच्या मूर्ती, प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून राम नामाचा जल्लोष केला.

यावेळी मंदिर, चौकातून भाविकांना पेढे, लाडू, जिलेबी, महाप्रसादाचे वाटप करण्यात आला तत्पूर्वी राम भक्त तरुणांनी अंगात पांढरा पोषाख परिधान करून डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवा पंचा हातात भगवा ध्वज घेवून सांगोला शहरात पायी दिंडी प्रदक्षिणा काढून प्रभू श्रीरामाचा जयजयकार केला.
अयोध्येत प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक सोहळा निमित्त सांगोला शहर व तालुक्यातील गावोगावी सकाळीच महिलांनी घरासमोर सडा, रांगोळ्या काढल्या होत्या तर तरुणांनी घरावर भगवे ध्वज ( गुढ्या ) उभ्या केल्या होत्या सकाळी तमाम राम भक्त व श्रीरामप्रेमीच्या वतीने कोष्टी गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिर येथून प्रभु श्री राम नामाचा जयघोष करीत मनेरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनुमान मंदिर ,मेन रोड, परीट गल्ली, शनी गल्ली ते महादेव मंदिर ते राम मंदिरासमोर तरुणांनी प्रभू रामचंद्र की जय..जय श्रीराम च्या जयघोषात नगर प्रदक्षिणाची सांगता महादेव गल्ली याठिकाणी झाली त्यानंतर श्री राम मंदिरासमोर राम भक्तांनी, महिलांनी जय श्रीराम च्या जयघोषात नृत्य सादर करीत आनंदोत्सव साजरा केला

दरम्यान सांगोला शहरातील राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीस अभिषेक धार्मिक विधी केला.श्रीराम मंदिरात महिलांनी सामुहिक राम रक्षा पठण करुन श्रीराम महिला भजनी मंडळाच्यावतीने भजन गायन केले दुपारी 12:30 वाजता पुष्पवृष्टी, महाआरतीनंतर भाविकांना लाडूचे वाटप केले. श्रीराम तरुण मंडळ व नामसाधना मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम भक्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाचेगाव येथील ह भ प कल्पेश महाराज यांचे राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठानच्या निमित्ताने कीर्तन झाले. यावेळी जय श्रीरामाच्या जयघोष पुष्पवृष्टी आरती केली.यावेळी अच्युत फुले यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराज मंडळींचा सत्कार केला मेन रोड येथील मारुती मंदिरात मारुतीस अभिषेक धार्मिक विधी करण्यात आला. महात्मा बसवेश्वर महिला भजनी मंडळ, समर्थ महिला भजनी मंडळ व रुद्र महिला भजनी मंडळांनी राम नामाचा जपासह सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत भजन सेवा केली त्यानंतर दुपारी 12:30 वाजता रामभक्त देविदास हुंडेकरी यांच्या हस्ते महाआरती, शंख नाद झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप केला. या कार्यक्रमासाठी हनुमान भक्त, राम भक्त, व्यापारी बांधवांनी सहकार्य केले तसेच वज्राबाद पेठेतील अमर गणेश मंडळाच्या वतीने मारुती मंदिरास विद्युत रोषणाईसह भगव्या पताका, ध्वज उभे करून फुलांनी सजवले होते. सकाळी प्रभाकर घोंगडे यांच्या हस्ते मारुतीला अभिषेक करून धार्मिक विधी पार पाडला त्यानंतर भजन सेवेनंतर 12:30 प्रभू श्रीरामचंद्र  यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तत्पूर्वी बाल कलाकाराच्या रुपातील प्रभू राम लक्ष्मण सीता यांचेवर पुष्पवृष्टी केली यावेळी उपस्थित रामभक्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली यासाठी अमर गणेश मंडळाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

 

तसेच लोहार गल्ली येथील नृसिंह गणेशोत्सव मंडळाच्यावतीने नृसिंह मंदिरास विद्युत रोषणाईसह पताका लावून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.  सायंकाळच्या सुमारास लोहार गल्ली येथे ह.भ.प.सुप्रिया महाराज बंडगर यांचे किर्तन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादही आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महूद येथील मारुती मंदिरात दीपक धोकटे यांच्या हस्ते मारुतीच्या मूर्तीस अभिषेक केला मंदिरात सकाळपासून भजन गायन कार्यक्रम झाला दुपारी नियोजित वेळी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेवर बोला सियापती प्रभू रामचंद्र की जय.. जय श्री रामाच्या जयघोषात पुष्पवृष्टी केली यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप केले. तत्पूर्वी रामभक्तांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची जय श्री रामाच्या घोषणा देत गावातून सवाद्य मिरवणूक काढून जल्लोष केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!