सहयाद्री फार्मसीच्या बी.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जीपॅट-२४ परीक्षेत दैप्तिमान यश
२००५ ची स्थापना असलेले सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी हे एक अनुभवी व फार्मसी ज्ञानाचे एक गुरुकुलच आहे.या महाविद्यालयात डी.फार्मसी, बी.फार्मसी, एम.फार्मसी अभ्यासक्रम उपलबध आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस हि केंद्र शासनाची संस्था असून ती दरवर्षी संपूर्ण भारतात बी.फार्मसी अंतिम
वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जीपॅट परीक्षा घेते. जीपॅट-२४ परीक्षा ८ जून २०२४ रोजी झाली होती.या जीपॅट-२४ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या एम.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्र शासनामार्फत विशेष शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले जाते.
बी.फार्मसी अंतिम वर्षाचे विद्यार्थी चि.सुदगीर सोनवणे, कु.महानंदा लोखंडे, चि.प्रणव आदलिंगे, कु.ताई मोटे, कु.ज्योती कोळी, कु.पुरविता वाघमोडे, कु.प्रीती क्षिरसागर, कु.शिवानी भुसे, चि.कुलदीप काटे, कु.ऋतुजा शेटे, कु.भार्गवी रपेली हे विद्यार्थी या केंद्रीय स्थरावरील परीक्षेत विशेष प्रावीण्यासहीत उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुछ देऊन सत्कार करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाने बी.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी औषधनिर्माण क्षेत्रातील नामवंत व तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते.महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन, कॉलेजने आयोजित केलेले मार्गदर्शनपर व्याख्याने, कॉन्फेरंस, सेमिनार, वर्कशॉप, गेस्ट लेक्चर, अभ्यासमय व शैक्षणिक वातावरण, डिजिटल शिक्षण पद्धती, सेवा सुविधा यामुळेच आम्ही अश्या केंद्रीय परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मोलाची मदत झाली असे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी मांडले.या यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालय जीपॅट विभागाचे प्रा.एस.एस.काळे,डॉ.एन.ए.तांबोळी,प्रा.औदुंबर माळी,प्रा.व्ही.पी.आनेकर,प्रा.सुनयना माळी,यांचे मार्गदर्शन लाभले.