महाराष्ट्र
काव्य,संगीतात रंगली सांगोला रोटरीची क्लब ची कोजागिरी..

.सांगोला- कविता,गाणी,सांगित,किस्से,माहि ती,कोडे अशा विविध कार्यक्रमांनी सांगोला रोटरी क्लबची कोजागिरी उत्साहात व सूरमयी संगीतात संपन्न झाली.
कोजागिरी म्हटले की पुर्ण चंद्रबिंब,स्वच्छ चांदणे,आटीव दूध,गप्पा व गाण्याची मैफिल असे चित्र असते..रोटरी क्लब सांगोला यानी हैप्पी पार्क येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वानी याचा आनंद घेतला..प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी सर्व उपस्थिताचे स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथमतः नूतन सद्स्य रो.प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी कोजागिरीचे मह्त्व सांगुन सर्वांचे स्वागत करताना कोजागिरी व चंद्राशी संबंधित तीन कविता सादर केल्या..सौ मनिषा ठोंबरे यानी लेक माझी, आम्ही सावित्रिच्या लेकी आणि तीळगुळ विषयी कविता सादर केल्या…रोटरी क्लबचे मार्गदर्शक डॉ.प्रभाकर माळी व प्रतिमा माळी यानी कोराव्के संगीतावर युगल गीते सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढविली…
त्याच प्रमाणे मिलिंद बनकर,महेश गवळी,प्रविण मोहिते यानी गीतगायन केले..माधुरी गुळमिरे यांच्या चला विसावू या वळणावर…या गिताला भरभरून दाद मिळाली…प्राचार्य डॉ.साजिकराव पाटील.इंजि.मधुकर कांबळे,रो.विजय म्हेत्रे यानी देखिल गीतगायन करुन सांगितीक आनंद लुटला…गरमगरम भजी,भेळ,जिलेबी,आटीव दूध,पुलाव यानी कोजागिरिची लज्जत वाढवली.मध्यंतरी रो.माणिकराव भोसले यानी कोजागिरी व दूध यांचे महात्म्य विषद करताना हिरकणी व शिवाजी महाराजांची कथा सांगुन दूध,मातृत्व यावर विवेचन केले…प्रीतिभोजनाने व सुमधुर दूध पिऊन कोजागिरीच्या सांगता करण्यात आली..रो.डॉ. प्रभाकर माळी यांच्या सहकार्याने अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे व सचिव रो.इंजि.विलास बिले यानी कार्यक्रमाचे नियोजन केले होते..या कार्यक्रमास क्लबचे बहुसंख्य सदस्य आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.