सांगोला 253 विधानसभा मतदारसंघाची बैठक दिनांक 19/ 10/ 24 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी तथा प्रांताधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तहसीलदार , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी मुख्याधिकारी नगरपालिका सांगोला, पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे सांगोला, मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला उपस्थित होते
सर्व नोडल अधिकारी यांनी वेगवेगळ्या विषयावर कशा पद्धतीने नियोजन करणे अपेक्षित आहे याबाबतचा आढावा तसेच पोस्टल मतदानाची काळजी घेणेबाबत, खर्च पथकाने संबंधित नमुने ठेवणे बाबत तसेच नामनिर्देशन अर्ज भरण्याबाबत व तपासणी बाबतच्या सूचना अमित माळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व नोडल अधिकारी यांना आज दिलेले आहेत
सांगोला 253 विधानसभा मतदारसंघात एकूण 305 व नेमण्यात आलेले आहेत आज बीएलओ यांच्या बैठकीमध्ये सर्व बीएलओनी 85 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती 4221 व दिव्यांग 3156 या लोकांचे घरी जाऊन दोन दिवसांमध्ये भेट देऊन 12 डी फॉर्म भरणे बाबत सूचना देण्यात आलेले आहे तसेच सर्व बीएलओ नी चांगले काम केले आहे या वेळेस सुध्दा चांगले काम करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे