सांगोला महाविद्यालयामध्ये वाणिज्य व इंग्रजी विभागाच्या वतीने ‘ विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ‘ या विषयावर कार्यशाळा संपन्न.

सांगोला / प्रतिनिधी : दिनांक – १७/१०/२०२४ गुरुवार रोजी सांगोला महाविद्यालयामध्ये ‘एम पॉवर माइंड मॅटर्स फाउंडेशन’, ग्रामीण रुग्णालय,सांगोला, वाणिज्य व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली
.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले होते .त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले तसेच, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘एम पॉवर माइंड मॅटर्स फाउंडेशन’ संवादमित्र सौ.निकिता पवार, सौ.सुनीता गडहिरे, सौ.स्वाती पवार हे उपस्थित होते. या कार्यशाळेत सौ.निकिता पवार व सौ.सुनीता गडहिरे यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्याबद्दल माहिती दिली व मानसिक आजारांची सुरुवात व त्यावरील उपाययोजना विद्यार्थ्यांना सांगितल्या.
विद्यार्थी दशेत मोबाईलच्या अतिवापरामुळे व छोट्या छोट्या गोष्टीमुळे येणारा मानसिक ताण तणाव कसा दूर करता येईल हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर समुपदेशन सांगितले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ सौ.विद्या जाधव यांनी केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित अंतर्गत गुणवत्ता कक्ष प्रमुख प्रा.डॉ.रामचंद्र पवार तसेच इंग्रजी विभागप्रमुख डॉ.ए.आर.मासाळ, प्रा.सौ.प्रज्ञा काटे व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रा.प्राप्ती लामगुंडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.भाग्यश्री पाटील मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन