रविवारी दिपकआबांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडणार ऐतिहासिक स्नेहसंमेलन

सांगोला तालुका आणि अगदी राज्याच्या बाहेरही दिपकआबा साळुंखे पाटील यांचा करिश्मा पाहायला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर आणि परिसरात वास्तव्यास असणाऱ्या हजारो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दि २९ रोजी सायं ५.०० वा. वाशी स्टेशन समोरील सिडको एक्जीबीशन आणि कन्व्हेनशन हॉल नवी मुंबई येथे ऐतिहासिक स्नेहसंमेलन पार पडणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील गाव भेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच पश्चिम बंगाल दौरा करून कलकत्ता येथे सांगोला तालुक्यातील शेकडो गलाई बांधवांशी संवाद साधला होता. तालुक्यातील नागरिक परराज्यातील व्यवसायिक यांच्यानंतर आता मुंबई आणि महानगरात पसरलेल्या व्यवसायिक उद्योजक आणि नोकरदारांशी दिपकआबा संवाद साधणार आहेत.
सांगोला तालुक्यातून उद्योग व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर करून मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल आणि पालघर परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना आपला उद्योग व्यवसाय आणि नोकरी करताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी तसेच अन्य विषयावर सुसंवाद साधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी हा स्नेह मेळावा आयोजित केला आहे या स्नेह मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित राहून या परिसरातील हजारो व्यावसायिक आणि नोकरदारांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेणार आहेत. त्याचबरोबर अनेक वर्षे सांगोला तालुक्यातील आपल्या जन्मभूमीपासून दूर असलेल्या येथील आपल्या बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समवेत स्नेहभोजन करणार आहेत. दरम्यान या ऐतिहासिक स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी सुरू असून दिपकआबांच्या स्नेह मेळाव्याचे पोस्टर आणि बॅनर मोठ्या संख्येने मुंबई नवी मुंबई परिसरात झळकू लागले आहेत.
सांगोला तालुक्यातील मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल पालघर आणि परिसरात वास्तव करत असणाऱ्या नागरिकांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भीमराव घेरडे सर, ॲड. समाधान काशीद, दीपक चव्हाण, जनार्दन अठराबुद्धे, सुनील मेटकरी, लिंगाप्पा हातेकर, राजेंद्र मागाडे, सावंता कोळेकर, शंकर आबा कोळेकर, मारुती खंडागळे, बाळासाहेब मोटे,वसंत सरगर, रामचंद्र आलदर, उत्तम सरगर, यशवंत शिवाजी मोहिते, मारुती रामकृष्ण नलवडे, ॲड.बशीर पटेल, राजू चवरे, आनंदा व्हनमाने, अनिल अर्जुन, दिलीप नायकुडे, शरद माने यांच्यासह या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केले आहे.
फोटो ; दिपकआबा