सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे अध्यक्ष व सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ. अनिकेत भैया देशमुख यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. ४ ऑक्टोबर रोजी कविता पाटील मॅडम यांच्या सौजन्याने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना रंगपेटी व चित्रकलेची वही वाटप करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रा.केशव माने,संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे,संस्थेचे सदस्य अशोकराव शिंदे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध, दशरथ जाधव सर, तात्यासाहेब इमडे सर, ज्येष्ठ शिक्षक माणिकराव देशमुख सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता इंगोले मॅडम, वैशाली बेहेरे मॅडम तसेच शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य फुले सर यांनी केले.शेवटी आभार अनिल पवार सर यांनी मानले.