सांगोला फॅबटेक मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात १६ मे २०२५ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड यांनी दिली.
या मेळाव्याची सुरवात डीन अकॅडमिक डाॅ. शरद पवार, डीन स्टुडंट डाॅ. संजय पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड, प्रा. सुकन्या बिराजदार, पालक प्रतिनिधी योगेश्वरी खंदारे, अरविंद पांढरे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरवात करण्यात आली.
मेळाव्याच्या सुरवातीस पालक प्रतिनीधी यांचे पुष्पगुच्छ देऊन विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड यांनी विभागातील शैक्षणिक आलेख, शैक्षणिक गुणवत्ता याशिवाय विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धा याविषयी महत्वपूर्ण माहिती पालकांना दिली.
याशिवाय डीन अकॅडमिक डाॅ. शरद पवार, डीन स्टुडंट डाॅ. संजय पवार यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित केले.



