कोडमाइंड टेक्नॉलॉजी पुणे यांचा सांगोला येथे स्नेह मेळावा संपन्न

कोडमाइंड टेक्नॉलॉजी पुणे यांचा स्नेह मेळावा सांगोला येथे मोठ्या उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला.
यावेळी कोडमाइंड टेक्नॉलॉजी च्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांगोला व इतर परिसरातील निवड झालेल्या विद्यार्थ्याचा कंपनीतर्फे सत्कार करण्यात आला.
कोडमाइंड टेक्नॉलॉजी ही नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.
आत्ता पर्यंत 150 हून अधिक विद्यार्थ्यांना MNC कंपनीत नोकरी लावण्याचे काम केले आहे.
यावेळी गजानन खरात, चंदन जाधव, उमेश बिचुकले, धनाजी माढेकर यांनी मार्गदर्शन केले.
शेवटी धनंजय मासाळ यांनी आभार मानले.