महिलांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा संपन्न
इनरव्हील क्लब सांगोला यांच्यावतीने

सांगोला:- इनरव्हील क्लब सांगोला यांनी महिलांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत खरंच महिलांनी आपल्या कला कौशल्याचा व टाकाऊ पासून टिकाऊ कसे तयार करायचे याचा खूप छान प्रकारे उपयोग केला. त्यांनी इनरव्हील लोगो व इनरव्हील क्लब चे नाव वापरून आकाश कंदील तयार करून इनरव्हील क्लब चा प्रसार केला.
मोठ्या संख्येने महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. सर्वांनी खूप छान छान व वेगवेळ्या प्रकारचे आकाश कंदील बनवले होते.परीक्षकांना परीक्षण करण्यात खूप वेळ गेला .
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी बेले ,द्वितीय क्रमांक गायत्री पाटणे यांच्यासह सहभागी सर्व विजेत्या महिलांचे इनरव्हील अध्यक्षा उमा उंटवाले यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी इनरव्हील च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.