फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस स्पर्धेत् यश

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी अबॅकस स्पर्धेत यश संपादन केले आहे.
अबॅकस मुळे गणित विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होऊन विद्यार्थ्यांचा गणित सोडवण्याचा सराव होतो व विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापरून गणित कशा पद्धतीने सोडवावीत याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात.
23 जून 2024 रोजी डॉ.निर्मल कुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशन 2023-24 मध्ये प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन 2023-24 मध्ये विश्व ब्रेन डेव्हलपमेंट अबॅकस या अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. लातूर, सोलापूर ,उस्मानाबाद व सातारा या इतर जिल्ह्यातूनही या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा सहा मिनिटात 100 गणिते अचूक सोडवण्याची होती. फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलमधील इयत्ता तिसरतील श्रीशैल मोरे, चौथीतील शौर्य हजारे, नक्ष कांबळे, तनिष्का बेंगलोरकर यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये इयत्ता तिसरीतील श्रीशैल मोरे व चौथीतील शौर्य हजारे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पारितोषिक स्वरूप सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली .तर फायनलिस्ट मध्ये तनिष्का बेंगलोरकर व नक्ष कांबळे यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली.
संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ. वर्षा कोळेकर, व सुपरवायझर वनिता बाबर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरीदा मुलाणी यांनी केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.