ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवाराचे निधन

 चिकमहूद ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जाती या प्रवर्गातील सदस्य पदाचे उमेदवार श्री. किसन सोपान यादव (वय 60)यांचे काल शुक्रवार दिनांक 03 नोव्हेंबर रोजी निधन झाल्याने प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेली सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.  सध्या निवडणुकीचा प्रचार सुरु असून  दिनांक 05/11/2023 रोजी सदर ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
मौजे चिकमहूद येथील प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेली सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करणेबाबत आदेश ग्रामपंचायत चिकमहुदचे निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत जाधव यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button