महाराष्ट्र

वासुद गावचे सुपुत्र व.पो.नि.तानाजी सावंत यांना पोलीस उपअधीक्षक पदावर बढती

वसुद ता. सांगोला येथील सुपुत्र तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगली  तानाजी सावंत यांची कोल्हापूर पोलिस मुख्यालय येथे पोलिस उपअधीक्षक (गृह) पदावर पदोन्नती. यापूर्वी कुविख्यात बिष्णोई टोळीतील गुन्हेगारांना पकडल्या प्रकरणी त्यांचा शौर्य पदक देऊन राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत असणारे वासुद ता.सांगोला येथील तानाजी दिगंबर सावंत यांनी २०१७ पासून फरार असलेले बिष्णोई टोळीतील गुन्हेगार ज्यांच्यावर विविध राज्यात खुनाचा प्रयत्न,सरकारी नोकरावर हल्ला , बेकायदेशीर अग्निशत्र बाळगणे,दरोडा, अपहरण असे गुन्हे ज्यांच्या नावे होते.अश्या बिष्णोई गँग मधील म्होरक्या श्यामलाल गोवर्धन पुनिया, श्रीराम पाचाराम बिष्णोई आणि श्रावणकुमार मनोहरलाल मांज्यू हे गुन्हेगार  २८ जानेवारी २०२० रोजी हुबळी येथून नाकाबंदी तोडून आल्याची बातमी माहिती राजस्थान पोलिसांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना कळविली होती.यावर पोलिस अधीक्षक यांनी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रीय महामार्ग नाकेबंदी करणे सूचना केल्या होत्या. नाकीबंदी दरम्यान किनी टोल नाक्यावर पोहोचलेल्या बिष्णोई टोळीला पोलिसांचा सुगावा त्यांनी तानाजी सावंत यांच्या पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला.यावेळी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक  नामदेव यादव यांच्यावर गुन्हेगारांनी झाडलेली गोळी अगदी त्यांच्या जवळून गेली. मात्र पोलीस पथकावर गोळीबार करून पलायन करणाऱ्या या टोळीला पो. नि.तानाजी सावंत यांच्या पोलीस पथकाने  जीवाची बाजी लावून पकडले होते.

त्यांनी केलेल्या साहसी कार्यतुत्परतेची दखल घेऊन त्यांना २९ जुलै २०२५ रोजी. पोलिस दलातील अतुलनीय कामगिरी बद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव यादव यांना राजभवन मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती यांचे प्रमाणपत्र तसेच पोलीस शौर्य पदक बहाल करून गौरव केला होता.यावेळी उप  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व अधिकारी उपस्थित होते.

——————————————-

राज्यातील १५६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली त्यामध्ये वासुद ता.सांगोला येथील रहिवासी तानाजी सावंत यांना कोल्हापूर मुख्यालय येथे पोलिस उपअधीक्षक (गृह) पदावर गुरुवार २८ ऑगस्ट रोजी नियुक्ती देण्यात आली. त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी सांभाळताना पोलिस दलात केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल वसुद गावासह सांगोला तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button