रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने सायकल वाटप.

रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने आज शुक्रवार दिनांक 28 जून 24 रोजी 30 सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष साजिकराव पाटील यांनी प्रास्ताविक करून व सर्व सदस्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केली.
या सायकली विद्यार्थ्यांना वाटल्या नसून शाळांना वाटप केलेले आहे. सायकलींची रोटरी सायकल बँक प्रत्येक शाळेमध्ये तयार होणार आहे. रोटरी सायकल बँकची कल्पना अशा पद्धतीचे आहे. बँकेत सर्व सायकली राहतील आणि शाळा प्रत्येक वर्षी गरजू मुलींना त्या सायकली दिल्या जातील.
एक मुलगी आठवीत आल्यानंतर ती दहावीपर्यंत सायकल वापरेल परंतु त्याचा सर्व मेंटेनन्स दुरुस्ती सर्व शाळा देखरेख करेल.
बँकेतील सायकली जोपर्यंत सुस्थितीत आहेत तोपर्यंत वेगवेगळ्या मुलींना सायकल वापरता येईल संकल्पना आहे.
तसेच प्रत्येक वर्षी या सायकल बँक मध्ये अजून सायकलींची भरच पडेल हे निश्चित आहे तसेच रोटरी क्लब सुद्धा या बँकेत प्रत्येक वर्षी भर घालण्याचा प्रयत्न करणार आहे.या सायकल बँकच्यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट व अकलूज क्लब यांनी सी.एस.आर. फंडातून मदत केलेली आहे.
या कार्यक्रमासाठी रो.दीपक चोथे,रो.विकास देशपांडे रो. विलास बिले रो. शरणप्पा हळळीसागर रो.मधुकर कांबळे रो.गुलाबराव पाटील रो.संतोष गुळमिरे रो. ज्ञानेश्वर कमले. रो विजय म्हेत्रे रो. श्रीपती आदलिंगे. रो.धनाजी शिर्के रो.मोहन मस्के सर रो.अनिल कांबळे या कार्यक्रमासाठी महिला सदस्य रो. प्रतिमा माळी.रो.मंगलताई चौगुले. रो वर्षा देशपांडे. तसेच सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.संतोष भोसले यांनी सुंदर पद्धतीने केले.
या कार्यक्रमाबद्दल लाभार्थी शाळांनी आपल्या भावना व्यक्त करताना रोटरीने केलेल्या सामाजिक कामाचा गुणगौरव सुद्धा केला व शाळेचा एक मुलगी धनश्री संतोष नवले या हीने सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अशाचप्रकारे रोटरीने सतत काम करत राहावं अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुढील वर्षीचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी केले.