“माझ्यासाठी विषय संपला”, रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त, बच्चू कडूंसंबंधी केलेलं वक्तव्य घेतलं मागे

बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत रवी राणांनी पदडा टाकला आहे

मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खोक्यांवरून वाद सुरु होता. या वादावर आता रवी राणा यांच्याकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रवी राणा यांनी चर्चा केली. त्यानतंर आता रवी राणांनी शब्द मागे घेतल असल्याचं जाहीर केलं. माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर, परत घेतो. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. परंतु, बच्चू कडू यांनीही आपले अपशब्द मागे घेतले पाहिजेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवी राणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचारांमध्ये मतभेद होत असतात. बच्च कडू आणि मी सरकारबरोबर आहे. या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास, उन्नती आणि जनतेला न्याय देण्यासाठी राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आहे. अडीच वर्षात उद्धव ठाकरे करु शकले नाहीत, ते तीन महिन्यांत या सरकारने केलं. त्यामुळे हा विषय मी संपवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button