सांगोला रोटरी क्लबच्या सदस्यांची सांगोला ते पंढरपूर आषाढी पायी वारी ….

सांगोला रोटरी क्लबच्या सदस्यांनी यावर्षी सांगोला ते पंढरपूर अशा पायी वारीची सुरुवात आज विठ्ठलाच्या नाम घोषात, जल्लोषात झाली.रोटरीचे अध्यक्ष रो. इंजि. विकास देशपांडे यांनी सांगितले की सदरची वारी रोटरीची जनसामान्यांमध्ये प्रतिमा वाढवण्यासाठी घेतली गेली. या वारीमुळे रोटरी चे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
रोटरी क्लबच्या या वारीचा मुक्काम खर्डी येथे असून पहाटे सर्व सदस्य पायी चालत निघून पंढरपूर येथे पोहोचतील.उद्या आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन सदर वारीची सांगता होईल.या वारीची संकल्पना दीपक चोथे रमेश अण्णा देशपांडे व डॉक्टर गव्हाणे यांनी मांडली व सहकार्य केले.

या दिंडी सोहळ्यामध्ये सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे , सचिव विलास बिले, डॉ.प्रभाकर माळी ,दीपक चोथे , नितीन इंगोले , साजिक राव पाटील , अशोक गोडसे संतोष पिसे सौ. सविता पिसे रमेश अण्णा देशपांडे डॉक्टर गव्हाणे शरणप्पा हळळेसागर अनिल कांबळे धनाजी शिर्के अरविंद डोंबे बाळासाहेब नकाते तसेच अनेट स्वयंम शिर्के इ. सदस्य हजर होते
तसेच सांगोल्यातील इतर मान्यवर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.