नातेपुते नगरपंचायतीमध्ये संविधान दिन साजरा

नातेपुते(वार्ताहर):- नातेपुते नगरपंचायतीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. आलेल्या सर्व पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी,पत्रकार व कर्मचारी यांचे स्वागत करून प्रतिमा पुजन केले. तसेच संविधान उददेशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले. अध्यक्षीय भाषण नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे यांनी केले.
नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून नातेपुते शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान व लोकशाही या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये 215 विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन खुप सुंदर निबंध लिहले. त्यामध्ये 5वी ते 7वी गटामध्ये प्रथम क्रमांक निटवे प्रांजल आप्पासाहेब इ.6वी एस एन डी स्कूल., द्वितीय क्रमांक निटवे पायल आप्पासाहेब इ.7वी एस एन डी स्कूल, तृतीय क्रमांक ढोबळे हर्षदा मारुती इ.5वी एस एन डी स्कूल , उत्तेजनार्थ चिंचकर हर्षवर्धन जयंत इ.6वी. दाते प्रशाला, शेंडे सोनाक्षी इ.7वी. समता स्कूल
8वी ते 10वी गट :-प्रथम क्रमांक वाळके अनन्या अभिजित इ.9वी.दाते प्रशाला , द्वितीय क्रमांक भोसले भूमी अशोक इ.9वी. समता स्कूल व ठोंबरे अंकिता. घुगरदरे प्रशाला , तृतीय क्रमांक भोमाळे श्रावणी तुकाराम इ.10 वी. दाते प्रशाला
व मोहिते संस्कृती समता स्कूल ,उत्तेजनार्थ सोरटे संचिता व एकळ वैजंती व घेमाड शिवराज
11वी व 12वी गट:-प्रथम क्रमांक पारेकर साक्षी 12वी मोहिते पाटील महाविद्यालय, द्वितीय क्रमांक करचे योगिता 12वी. रत्नप्रभा देवी प्रशाला ,तृतीय क्रमांक काळे सायली 12वी..मोहिते पाटील महाविद्यालय, उत्तेजनार्थ नरबट पिंकी..मोहिते पाटील महाविद्यालय व काझी आरशिया ..मोहिते पाटील महाविद्यालय..
यशस्वी स्पर्धकांना सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायतीचे अध्यक्ष उत्कर्षाराणी उमेश पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे शहाजीराव देशमुख, नगरसेवक रणजीत पांढरे ,अण्णा पांढरे,बाळासाहेब काळे, सुरेंद्र सोरटे, नंदू लांडगे, रावसाहेब पांढरे ,अविनाश दोशी, सविता बरडकर ,माया उराडे,माऊली उराडे,शक्ती पलंगे ,रोहित शेटे व पत्रकार समीर सोरटे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन परचंडे सर यांनी केले.