वाढेगांव येथील त्रिवेणी संगमावरील महादेव मंदिरास माजी मंत्री आ. सुभाष देशमुख यांची भेट

वाढेगांव (वार्ताहर) – वाढेगांव ता. सांगोला येथे असणार्या त्रिवेणी संगमावरील महादेव मंदिरास माजी मंत्री आ. सुभाष देशमुख यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी माण,कोरडा व अफ्रुका या तीन नद्यांच्या संगमवरील प्राचीन शिव मंदिर, येथे वास्तव्यास असलेल्या साधु महाराज तसेच त्रिवेणी संगम असलेल्या काशीसमान असणार्या या मंदिराची महती सांगण्यात आली. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या परिसरात एक वेगळेच समाधान वाटल्याचे त्यानी सांगितले. यावेळी माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्यावतीने आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. गजानन भाकरे, माणगंगा संस्थेचे अध्यक्ष वैजीनाथ घोंगडे, डॉ. विजयकुमार जाधव, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, उद्योजक अरुण पाटील, राजू वाघमारे, शंकर घोंगडे, विठ्ठल चव्हाण, सुभाष घोंगडे, सतीश घोंगडे, नवनाथ दिघे, नारायण दिघे, शंभु माने, सिद्धेश्वर मेटकरी (सर), शिवाजी (पपू) दिघे, संजय माने इ. सह ग्रामस्थ उपस्थित होते.