सायन्स प्रोजेक्ट बार्शी आयोजित सायन्स वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कर्ष विद्यालयाचे घवघवीत यश

सायन्स प्रोजेक्ट बार्शी युनिट अंतर्गत वय वर्ष 5 ते 16 गटातील मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन व ऍक्टिव्हिटी स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथेआयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये उत्कर्ष विद्यालयातील पाचवी ते सातवी गटांमध्ये वीस विद्यार्थी तर आठवी ते दहावी गटांमध्ये चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम क्रमांक:- चि. श्रीअंश राहुल शिंदे (इयत्ता सहावी) द्वितीय क्रमांक:- कु. मनस्वी बाळासो मिसाळ( इयत्ता सहावी) तृतीय क्रमांक:- चि. श्रेयस शरद बनकर (इयत्ता सहावी) उत्तेजनार्थ क्रमांक:-चि. समाधान बजरंग नवत्रे (इयत्ता सातवी) चि. अमेय पवार( इयत्ता सातवी) आणि आठवी ते दहावी गटांमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक :- कु. मृदुला रविंद्र कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक भोसले सर, कुंभार सर ,गंगथडे मॅडम, शेख मॅडम ,सावंत सर भोसले मॅडम ,गावडे सर यांचे सर्व संस्था पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री मिसाळ सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून खूप खूप अभिनंदन.