सांगोला तालुका

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी शाळा म्हणजे विद्यामंदिर-निलेश इंगळे

सांगोला (वार्ताहर):- MPSC संयुक्त मुख्य परीक्षेमधून राज्य कर निरीक्षक (STATE TAX INSPECTOR) पदी निवड झाल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे माजी विद्यार्थी निलेश विठ्ठलराव इंगळे यांचा सत्कार मुख्याध्यापक भिमाशंकर पैलवान व उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
पैशांपेक्षा मुलांच्या शिक्षणात केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य अधिक असून विद्यामंदिरमध्ये राबवल्या जाणा-या शिष्यवृत्ती,NMMS यासारख्या स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवत येथे झालेल्या शिक्षकांच्या अचूक व प्रोत्साहनपर मार्गदर्शनातून आयुष्याची दिशा ठरल्याचे विचार त्यांनी यावेळी मांडले.जिद्द,चिकाटी आणि महत्वाकांक्षा या गुणांची रुजवण या शाळेत झाली याबद्दल समाधान निलेश इंगळे यांनी सत्कारमुर्तींच्या मनोगतातून व्यक्त करत त्यांच्या यशात शाळा व पालकांचे योगदान मौलिक असल्याचे सांगितले.
यावेळी पर्यवेक्षक पोपट केदार आणि अजय बारबोले यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!