महाराष्ट्र
सांगोला तालुका आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार श्री उत्तम बेहेरे सर यांना जाहीर

महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळामार्फत प्रत्येक तालुक्यातून आदर्श विज्ञान शिक्षक निवडला जातो. सांगोला तालुक्यातून आदर्श विज्ञान शिक्षक निवडण्यासाठी रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न झाली. त्यामध्ये सांगोला तालुक्यातून आदर्श विज्ञान शिक्षक म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक श्री उत्तम जगन्नाथ बेहरे सर यांची सर्वांनुमते आदर्श विज्ञान शिक्षक म्हणून निवड करण्यात आली.
डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या विज्ञान अधिवेशनामध्ये हा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. श्री उत्तम बेहरे सर हे गेली सतरा वर्ष विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करीत आहेत. इयत्ता दहावी साठी मागील अकरा वर्षापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे ते अध्यापन करीत आहेत. तसेच मागील दोन वर्षापासून त्यांनी सांगोला विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे. तसेच इयत्ता दहावी बदललेल्या विज्ञान अभ्यासक्रमाचे त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या सहविचार सभेसाठी मंडळाचे सल्लागार निळकंठ लिंगे, यतिराज सुरवसे, भारत इंगवले,प्रदीप बाबर, अमोल रणदिवे, सचिव अतुल लुंगारे,अध्यक्ष उत्तम बेहरे उपस्थित होते. सर्व विज्ञान शिक्षकांनी उत्तम बेहेरे सर यांचे अभिनंदन केले.



