महाराष्ट्र
नॅशनल लेवल अबॅकस परीक्षेमध्ये अदिराज अबॅकस क्लासेस चा विजयाचा झेंडा कायम
आरुषी शिवशंकर शिंदे व अदिराज कोळसे पाटील राज्यात प्रथम तर आरोही कांबळे राज्यात द्वितीय तर ओवी तारळेकर राज्यात तृतीय.
सांगोला :मेट्रोबेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे सातवी नॅशनल लेवल अबॅकस परीक्षा 5 जानेवारी वार रविवार मोहोळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील जवळपास1500 विद्यार्थी सहभागी होते. यामध्ये अदिराज अबॅकस क्लासेस मधील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता z लेवलमधून आरुषी शिवशंकर शिंदे व अदिराज अनिल कोळसे पाटील राज्यात प्रथम तर zR लेवलमधून कुमारी आरोही बाळू कांबळे राज्यात द्वितीय आलेली आहे व B लेवलमधून कुमारी ओवी अभिजीत तारळेकर राज्यात तिसरी आलेली आहे.
तसेच क्लासेसच्या संचालिका सौ दिपाली अनिल कोळसे पाटील यांना सिने अभिनेता विजय पाटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट दिला जाणारा पुरस्कार (Top Franchise of the year award -2025) देऊन सन्मानित करण्यात आले सलग तिसऱ्यांदा या अवार्डच्या मानकरी ठरल्या आहेत तसेच क्लासेसच्या इतर विद्यार्थ्यांना अचीव्हर ट्रॉफी ,मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
क्लासेसचे विद्यार्थी त्रिभाष दलाई ,सोहम साळुंखे ,सानवी कांबळे ,श्रुती माळी, अक्षरा नवले ,भावना इंगोले, रितेश राजवाडे ,स्वराज बंडगर ,विराज जाधव जयेश जाधव ,आरव लांडगे , शिवांजली शिंणगारे ,दिग्विजय जगताप ,अंशू कदम ,आरोही चव्हाण, आलिया तांबोळी नेत्रा जाधव ,श्रीनंद कुंभार ,श्रेयश इंगोले ,धैर्यशील जाधव ,वेदांत माळी प्रांजली जगताप ,अनस इनामदार ,आयुष गायकवाड ,शिवांश शिंणगारे ,संस्कार शिंदे, आयुष जाधव ,मनवा मोरे ,अद्विता कुलकर्णी ,साईशा माळी ,आरोही शिंदे ,अथर्व माळी ,प्रणव लांडगे ,निवांश वाघमारे ,यशराज इंगोले ,अभिलेश सरगर, प्रेम मिसाळ ,प्रज्वल सपकाळ, नक्षराज माळी ,आर्या चव्हाण ,मनस्वी माळी व स्वराद गेजगे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेता विजय पाटकर , सुभाष यादव तसेच मेट्रोब्रेन अबॅकस कंपनीचे अध्यक्ष व सचिव श्री संतोष लोहारे सर व संचालिका सिमा लोहारे मॅडम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.