महाराष्ट्र

जि.प.प्रा.शाळा राजुरी केंद्र- उदनवाडी येथे तालुकास्तरीय किशोरी हितगुज व जनजागृती मेळावा संपन्न

सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त “लेक वाचवा लेक शिकवा” अभियान अंतर्गत तालुकास्तरीय किशोरी हितगुज व जनजागृती मेळावा राजूरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच घेण्यात आला.या मेळाव्यात मुलींसाठी विविध स्पर्धा,कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती,गीतमंच व व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

सांगोला तालुक्यातील राजूरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचे उदघाटन माजी सभापती राणीताई कोळवले,माजी उपसभापती शोभा खटकाळे,डॉ.प्रज्ञा लवटे,सरपंच प्रतिभा व्हळगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती सुतार, उपाध्यक्ष गोपीनाथ दबडे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी उपसभापती नारायण जगताप, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले,शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर,अमोल भंडारी, केंद्रप्रमुख दिनकर गाडे,माधुरी पावले,वैजयंती जाधव, आप्पासो पवार, दिलीप ढेरे, संतोष कांबळे,हेमंत बाबर ,ज्ञानेश्वर कोळेकर, मल्लय्या मठपती, सय्यद काझी, तानाजी साळे,अस्लम इनामदार,अमोगसिद्ध कोळी, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर करांडे आदी उपस्थित होते.

जि.प.प्रा.शाळा बाबर-सपताळवाडी शाळेतील विद्यार्थीनी भक्ती प्रशांत केदार ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती.प्रथम बालिका दिन प्रतिज्ञा शिलेदार वैशाली यांनी सर्व बालिका कडून म्हणून घेतली.त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनींना व्यायाम व योगाचे महत्त्व व प्रात्यक्षिक रुपाली पवार व सीमा करांडे यांनी करू घेतले.यानंतर गीतमंच स्वरसाधनेच्या माध्यमातून संगीता केसकर,सरला शिर्के,वैशाली शिलेदार,ज्योती पवार,सावित्रा कस्तुरे,सुभाष भडंगे,एकनाथ गुरव, तानाजी गायकवाड,श्रीनिवास हातेकर,कृष्णदेव शिंदे, अशोक शिंदे,समाधान ढेकळे,शिवाजी गुळीक,आदी शिक्षकांनी शिक्षणाचे महत्त्व,मुलींचे शिक्षण, कृतियुक्त गीते सादर केली. या कार्यक्रमात डॉ.प्रज्ञा लवटे यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.तसेच लिंग समभाव,शिक्षणाचे महत्व, स्वच्छता व मुलींचे आरोग्य यावर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

माजी जि.प.सदस्य तानाजी सुर्यगण यांनी संविधान विषयक मार्गदर्शन केले.तर मनीषा क्षीरसागर व स्मिता शिंदे यांनी मुलींना गुड टच,बॅड टच याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले व सजग राहण्याचा सल्ला दिला.यावेळी मुलींसाठी असणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधांची माहितीही या मेळाव्यात देण्यात आली.मुलींनी स्वसंरक्षण कौशल्ये आत्मसात करावीत.त्यासाठी बाळकृष्ण बंडगर यांनी कराटे प्रात्यक्षिके सादर केली.यामध्ये उदनवाडी शाळेतील मुली सहभागी झाल्या होत्या.या मेळाव्यात मुलींसाठी “कर्तबगार महिला”,”बेटी बचाओ-बेटी पढाओ”,”स्वच्छ विद्यालय-स्वच्छ भारत” या विषयावरती पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रांगोळी,चित्रकला,हस्ताक्षर,लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. लोकनृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक जि.प. शाळा वाणी चिंचाळे, द्वितीय क्रमांक जि. प. शाळा गौडवाडी, तृतीय क्रमांक जि. प. शाळा तरंगेवाडी याचे परीक्षक म्हणून अनुपमा गुळमिरे व पल्लवी थोरात यांनी काम पाहिले. पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक महीम शाळा, द्वितीय क्रमांक एखतपूर शाळा, तृतीय क्रमांक तरंगेवाडी शाळा, हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक स्नेहल इंगोले एखतपूर शाळा, द्वितीय क्रमांक सृष्टी चव्हाण देवळे शाळा, तृतीय क्रमांक ईश्वरी कांबळे पाचेगाव (बु) शाळा चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक निखद मुलाणी एखतपूर शाळा, द्वितीय क्रमांक राधिका शिंदे पाचेगाव(बु ), तृतीय क्रमांक तेजश्री येजगर वाणीचिंचाळे शाळा, रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक आराध्या गुत्तेदार वाणी चिंचाळे शाळा, द्वितीय क्रमांक सृष्टी चौगुले महीम शाळा, तृतीय क्रमांक अनुष्का माळी गौडवाडी शाळा या शाळांना ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिरभावी केंद्राचे केंद्रप्रमुख माधुरी पावले मॅडम व मांजरी व शिवणे केंद्राचे केंद्रप्रमुख वैजयंती जाधव मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर रांगोळी सावित्रा कस्तुरे,सरला शिर्के,सोनल सावंत यांनी काढली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वंदना पाटणे यांनी केले.तर प्रास्ताविक विस्ताराधिकारी अमोल भंडारी यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,केंद्रप्रमुख माधुरी पावले, वैजयंती जाधव, दिनकर गाडे, ज्ञानेश्वर करांडे व शिक्षिका वैशाली शिलेदार, सावित्रा कस्तुरे, सरला शिर्के, संतोष कांबळे,सुखदेव लवटे, सुभाष भोसले, संभाजी पवार, विजयकुमार जावीर, दिनेश गव्हाणे, कस्तुरा पाटील, विमल येडगे,पतंगराव बाबर,कृष्णदेव पवार,संतोष आदाटे,गंगाधर जुंधळे, तोहेरपाशा काझी,सचिन धोकटे,वैशाली भोसले, श्रद्धा जिरगे,लता पाटील,अनिता वारुळे,वर्षा बडे,सोनल सावंत , संगीता केसकर,स्मिता शिंदे, मनिषा क्षीरसागर, व गीतमंच टीम यांचेसह जुनोनी व परिसरातील शाळांमधील शिक्षकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक ,शिक्षिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button