जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टयांच्या दिवशी राहणार सुरू
दर वर्षी 1 एप्रिलला बाजारमुल्य दर तक्ते प्रसिध्द होत असल्याने. मार्च महिन्यात सर्व दुय्यमनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच अर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबधीचे कामकाज करण्यासासाठी व दस्त नोंदणसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि.23 मार्च व 24 मार्च 2024 तसेच दि29 मार्च ते 31 मार्च 2024 या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी दिवशी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ,सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.