सांगोला विद्यामंदिरची सृष्टी लिगाडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी सृष्टी सुनील लिगाडे ( इयत्ता बारावी कला ) हिने तिप्पेहळ्ळी येथे समाजरत्न कै. विष्णुपंत दादरे (लोणारी) यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यासाठी रोख रक्कम पाच हजार रुपये,गौरवचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक होते.
या यशस्वी विद्यार्थिनीचा संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका शहीदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,मच्छिंद्र इंगोले व वाड्.मंय मंडळातील शिक्षक उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थिनीला वाड्.मंडळातील प्रा.शिवशंकर तटाळे ( प्रमुख) प्रा.धनाजी चव्हाण,प्रा.अर्चना कटरे, प्रा.एस.डी.आलदर,प्रा.राधा रिटे,प्रा.महेर ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्था सचिव म.शं.घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.