जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडशिंगी येथे नवागतांचे उत्साहात स्वागत

जि प शाळा मेडशिंगी येथे नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.नवीन शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने दिनांक 15 जून रोजी जि प शाळा मेडसिंग येथे नवीन दाखल विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या प्रवेशद्वारावरच माता पालक गटाच्या सदस्य सौ मंजुषा कांबळे सौ अर्चना टेळे सौ अमृता सरगर सौ ज्योती राऊत सौ रोहिणी वाघमोडे सौ वृषाली राऊत यांनी औक्षण केले त्यानंतर विस्तार अधिकारी श्री लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब यांचे हस्ते पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विषय तज्ञ श्री विजय आनंद कांबळे साहेब यांचे हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. माता पालक गटाच्या सदस्य सौमंजुषा कांबळे सौ अर्चना टेळे सौ ज्योती राऊत अमृता सरगर सौ वृषाली राऊत सौ रोहिणी वाघमोडे यांचे हस्ते गणवेश वाटप करण्यात आले त्यानंतर मेडशिंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजेश गडहिरे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व नवीन दाखल विद्यार्थ्यांची सजविलेल्या गाडीतून संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सदरचा कार्यक्रम पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्राम विस्तार अधिकारी श्री बनसोडे भाऊसाहेब व गावातील सर्व नागरिक यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.
सदरचा कार्यक्रम नेटका होण्यासाठी केंद्रप्रमुख श्री राजेश गडहिरे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमा वेळी शाळेतील उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर श्री महादेव कमळे गुरुजी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री महारुद्र नाळेसाहेब विस्तार अधिकारी श्री लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब श्री सुयोग नवले साहेब श्री गायकवाड साहेब श्रीमती वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले