महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता अकरावी पालक -शिक्षक सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे इयत्ता अकरावी कला,वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी अकरावी वार्षिक परीक्षा व इयत्ता बारावी पूर्वतयारी नियोजन यासंदर्भात द्वितीय सत्र पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली.
यावेळी उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना इयत्ता अकरावी परीक्षा लवकर घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करत बारावीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा ,पालकांनी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासंदर्भात, गुणवंत विद्यार्थी योजना यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे व ज्येष्ठ अध्यापक प्रा.चिंतामणी देशपांडे उपस्थित होते. सभेमध्ये शास्त्र शाखेसाठी प्रा.नागन्नाथ म्हमाणे,प्रा.उल्हास यादव,प्रा.महेश जुदंळे,प्रा.दिलीप मस्के यांनी मार्गदर्शन केले.तर कला शाखेसाठी प्रा.अर्चना कटरे,प्रा.नवनाथ बंडगर,प्रा.मेहर ढवळे,प्रा.इसाक मुल्ला व वाणिज्य शाखेतील प्रा.राजेंद्र कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पालकांच्या शंकांचे निरसन उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे सर यांनी केले.
या सभेसाठी पालक, विद्यार्थी, ज्युनिअर कॉलेज शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.अर्चना कटरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.निलेश नागणे यांनी केले .