सांगोला विद्यामंदिरमध्ये शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.मंजुनाथ बुर्जी व प्रा.स्वप्निल देशमुख यांचे मार्गदर्शन

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना DKTE Society’s Textile & Engineering Institute इचलकरंजीचे प्रा.डॉ.मंजुनाथ बुर्जी व प्रा.स्वप्निल देशमुख यांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक सांगोला संस्थेचे सचिव म.श. घोंगडे, प्राचार्य गंगाधर घोंगडे ,उपप्राचार्य शहिदा सय्यद उपस्थित होत्या.
प्रा.डॉ..मंजुनाथ बुर्जी यांनी टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये करिअर करणे संदर्भात मार्गदर्शन करताना सध्या खूप मागणी असणारे क्षेत्र म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्री आणि या संदर्भात इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारतात फक्त पाच कॉलेज आहेत.त्यापैकी तीन कॉलेज महाराष्ट्रात असून एक कॉलेज इचलकरंजी येथे आहे असे सांगत शाखेची किंवा विषयाची निवड कशी करावी , अभ्यास विषय किंवा शाखा निवडल्यानंतर कॉलेजची निवड करत असताना कॉलेज विषयी कोणकोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी व कॉलेज कसे निवडावे यासंदर्भात अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व शास्त्र शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अश्विनी जालगिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.तानसिंग माळी यांनी केले.