फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न

सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उद्योजकता विषयावर कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा शरद पवार यांनी दिलीं.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर येथील ज्युनियर प्रोजेक्ट ऑफिसर श्री प्रशांत महामुरे व मिटकॉन प्रोजेक्ट ऑफिसर चंद्रकांत लोंढे उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रशांत महामुरे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी त्यानी प्राईम मिनिस्टर रोजगार निर्मिती योजने मार्फत एक लाख रुपयापासून १० कोटी पर्यंत शासन अनुदान देत असल्याचे
सांगितले.तसेच शेती पुरक लघू उद्योगामध्ये भरपूर वाव असल्याचे सांगताना जिल्ह्यातील हुरडा पार्टी,मत्स्यपालन, कुल्फी, पेढा या
व्यवसायाची माहिती दिली.
मिटकॉन चे प्रोजेक्ट ऑफिसर चंद्रकांत लोंढे यांनी मार्गदर्शन करताना भारत हा जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश असल्याने पस्तीशी नंतर ची बेरोजगारी टाळायची असल्यास उद्योजग बना असा कान मंत्र दिला.यावेळी त्यानी महाराष्ट्र शासन व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या
मार्फत दरवर्षी एक हजार तरुणाना कर्ज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मेकॅनिकल
विभागाचे प्रमुख प्रा दत्तात्रय नरळे यांनी केले.

या कार्यशाळेसाठी सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा शाम कोळेकर ,इल्क्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युंकेशन विभागाचे प्रमुख प्रा महेश वाळुजकर अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा तानाजी बुरुंगले सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.